चिदगिरी येथिल सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब देशमुख तर उपचेअरमनपदी जीवन सोमला चव्हाण यांची बिनविरोध निवड..



भोकर :(दि.25 जानेवारी) भोकर तालुक्यातील मौजे चिदगिरी येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज दि.25 जानेवारी रोजी पारपडली असून चिदगिरी येथिल गावकऱ्याच्या आशीर्वादाने ती बिनविरोध झाली सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब उर्फ दिलीपराव देशमुख तर उपचेअरमनपदी जीवन सोमला चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली,असून यात सर्व च्या सर्व 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

         कै.गणेशराव देशमुख व कै. आनंदराव गणेशराव देशमुख  यांची प्रेरना घेऊन  सर्वच्या सर्व 13 उमदवारांनी सोसायटी बिनविरोध काढण्यासाठी सर्व गावकऱ्यांची मने जिंकली कै. गणेशराव देशमुख हे मागील 40 वर्षांपासून सेवा सहकारी सोसायटीवर चेअरमन पदी विराजमान राहिले होते हे विशेष आहे. आज सकाळी 11 वाजता सेवा सहकारी सोसायटीचे 13 सदस्य बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन.बी. जाधव यांनी घोषित केले. यामध्ये देशमुख विराज आनंदराव, देशमुख संगीताबाई साहेबराव, देशमुख विजयकुमार गणेशराव, सोनटक्के गंगाराम गणपती, चव्हाण सुरेखा शंकर, गिरी गंगागीर रामगिर, सर्कलवाड पार्वतीबाई नागोबा, देशमुख सुनंदाबाई आनंदराव, देशमुख पल्लवी प्रवीण, कांबळे प्रकाश नामदेव, व शहापुरे उत्‍तम नामदेव ईत्यादी बिनविरोध निवडून आले आहेत. निवडून आलेल्या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...