कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचा/प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार बी.आर.पांचाळ यांना ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान

 


भोकर (तालुका प्रतिनिधी ) निर्भीड, परखड, सामाजिक लिखाण करून अन्यायाला वाचा फोडणारे भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना कंधार येथील कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रबोधन कार ठाकरे युवा पत्रकारीता पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

       कंधार येथील हिंदवी बाणा लाईव्ह व कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान यांच्या वतीने 2021चा पुरस्कार वितरण सोहळा दि. 30 एप्रिल रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे पार पडला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय मराठवाडास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. भोकर येथील दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. आर. पांचाळ यांना प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारीता पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, शाल पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले

यावेळी, मठाधीश एकनाथ महाराज, शिवा संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, ईश्वरराव भोसीकर, अरविंद नळगे, ऋषी देसाई मुंबई, संतोष पांडागळे, अनिल मोरे, बालाजी पंडागळे, एक नाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...