अपघातात दोन बैला सह एक जण जागीच ठार


 

एकाला वाचविण्यात यश..शेलूबाजार-- नागपूर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या पेडगाव नजीक भरधाव मालवाहू ट्रकने चिरडल्याने दोन बैला सह एक जण जागीच ठार झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रकच्या कॅबिनखाली दबलेल्या क्लीनर ला वाचविण्यात यश आले आहे.

                    मिळालेल्या माहितीनुसार नागपूर औरंगाबाद महामार्गावर पेडगाव नजीक शेलुबाजार वरून कारंज्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू ट्रक क्र.एम.एच. ४२ ए.क्यू.३३६४ चा ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यावेळी ट्रकने दोन बैल घेऊन गावाकडे जात असलेल्या पेडगाव येथील विजय सुभाष देशमुख अंदाजे वय २२ यास मागून धडक दिली व बैलासह चिरडत नेले यावेळी ट्रक पलटी होऊन दोन बैल ट्रकखाली दबून ठार झाले तर विजय देशमुख यांची जागीच प्राणज्योत मालवली. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली तर ट्रकमधील क्लिनर सुरजित मदन सरकार रा.बारामती अंदाजे वय ४५ हा ट्रकच्या केबिन खाली दबून पडला होता यावेळी सा.रा. महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचावपथक, समृद्धी महामार्गावरील जेसीबी व इतर वाहनाच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या क्लीनर ला बाहेर काढण्यात यश आले. त्याला ताबडतोब आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले व त्यानंतर पुढील उपचाराकरिता अकोला येथे रवाना केले. घटनेची माहिती मिळताच पिएसआय मंजुषा मोरे पोलीस उपनिरीक्षक तुषार जाधव व इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. यावेळी काही काळ महामार्गावरील वाहतूक टप्प झाली होती. पोलिसांनी ताबडतोब यंत्रनांना पाचारण करून अपघातग्रस ट्रक यंत्राच्या साहाय्याने काढला यावेळी ट्रक खाली दबून‌ मृत्युमुखी पडलेल्या दोन बैलाचा अक्षरचा चुराडा झाला होता.काही काळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आदिवासी क्राती मराठी न्युज मंगरुळपिर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...