मनसे नेत्यांचा मराठवाडा दौरा " भोकर येथे कार्यअहवाल पाहणी व आगामी निवडणूक संदर्भात आज तालुका निहाय बैठकीचे आयोजन

 


भोकर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरुवारी ता २७ जानेवारी २०२२ रोज गुरुवारी कार्यअहवाल व येणाऱ्या नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती आगामी निवडणुक,कार्यअहवाल संदर्भात तालुका निहाय बैठक भोकर येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीपबापू धोत्रे (नेते मनसे) ,संतोष नागरगोजे (सरचिटणीस मनसे), प्रकाश काका महाजन (प्रवक्ता मनसे) ,अशोक तावरे (राज्यउपाध्यक्ष मनसे), सतनामसिंग गुलाटी(राज्यउपाध्यक्ष मनसे) आदि मनसेचे नेते उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आगामी निवडणुकीसंदर्भात सदरील बैठक भोकर येथील तालुका जन संपर्के कार्यालय बायपास रोड भोकर येथे ता २७ जानेवारी २०२२ रोज गुरूवारी दुपारी ३ वाजता होणार आहे आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भोकर येथे कार्य अहवाल पाहणी व आगामी निवडणूक संदर्भात तालुका निहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत मनसे नेते हे आगामी नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनिती भोकर मतदार संघात मनसे निती ठरवण्यासाठी व कॉंग्रेसचे पालकमंत्री यांच्या होम ग्राँऊडवर मनसे पेरणीची सुरुवात करण्यासाठी सदरील बैठकीचे आयोजन असल्याचे मनसे तालुका अध्यक्ष साई जटलावार यांनी सांगीतले सदरील बैठकीस मनसेचे तालुका , शहर, वार्ड  व ग्रामीण भागातील सर्व पद अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भोकर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने करण्यात आले आहे 


 

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...